ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..! मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. कणकवलीत गिरिजा प्रभुदेसाई यांचा 'कथक' नृत्य वंदना कार्यक्रम. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात. पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..!

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..!

Article image


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्याकडून सहभागी व यशस्वी ॲथलीटसचे विशेष प्रशंसेसह अभिनंदन.  


मालवण | प्रतिनिधी : क्रीडा युवकसेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परीषद यांच्यावतीने, मालवण तालुक्यातील शिरवंडे येथे खेळवल्या गेलेल्या मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये, मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूलच्या ॲथलीटसनी चमकदार कामगिरी केली आहे. दिनांक १३ व १४ ऑक्टोबर रोजी ह्या स्पर्धा खेळविण्यात आल्या. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांनी सर्व सहभागी व यशस्वी ॲथलीटसची विशेष प्रशंसा आहे. 


स्पर्धांमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटातल्या ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात कु. फ्लोरेन्स फर्नांडिस याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.


१७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात कु. सोहम चव्हाण याने प्रथम क्रमांक तर २०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु. सोहम चव्हाण याने १७ वर्षांखालील उंच उडी क्रीडा प्रकारात देखिल प्रथम क्रमांक प्राप्त केला.


रोझरी इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या रिले संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. 


१७ वर्षांखालील १०० मीटर अडथळा शर्यत ( हर्डल) क्रीडा प्रकारात कु. पार्थ कोडाचवाडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 


मुलींच्या १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात कु. निधी कांबळी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. 


१७ वर्षांखालील मुलींच्या अडथळा शर्यत ( हर्डल) क्रीडा प्रकारात कु. एंजल लुद्रीक हिने १९. २४ सेकंदाची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक प्राप्त केला.  


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वरील सर्व ॲथलीटसची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या सर्व ॲथलीटसना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे आणि प्रशिक्षक जेवी फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी सर्व सहभागी आणि यशस्वी ॲथलीटसचे अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स