जाहिरात
मालवणच्या श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्गच्या ३६२ व्या पायाभरणी सोहळ्यानिमित्त शासकीय पूजा उत्साहात.
मालवणच्या श्री मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्गच्या ३६२ व्या पायाभरणी सोहळ्यानिमित्त शासकीय पूजा उत्साहात.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते शासकीय पूजन तर तहसीलदार गणेश लव्हे व परिविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक शेलार यांच्यासह किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे सदस्य, शिवप्रेमींची उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६२ वा वर्धापन दिन सोहळा २५ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झाला. यावेळी श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा पाषाणासंदर्भातली ऐतिहासिक, पारंपरिक, भौगोलिक तसेच अध्यात्मिक माहिती देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते शासकीय पूजन पूजा करुन श्री क्षेत्र मोरयाच्या परिसरातील विकासासाठी व शिवप्रेमींच्या ऐतिहासिक आस्थेचा ठेवा स्मारक स्वरुपात जपला जावा तसेच सर्वांच्या अध्यात्मिक, धार्मिक व सर्वांगीण सुख, समाधान, शांती आणि समृद्धीसाठी विशेष गार्हाणे घालण्यात आले. शासकीय पूजेमध्ये तहसीलदार गणेश लव्हे व परिविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक शेलार यांचा सहभाग होता. किल्ले प्रेरणोत्सव समितीचे सदस्य व शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या जागर जाणीवांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. शिवकालिन पुरोहीत अभ्यंकर कुटुंबियांचे वंशज श्री. रविकिरण आपटे यांनी ३६२ व्या शासकीय पूजेचे पौरोहित्य केले. शिवप्रेमी भाऊ सामंत यांनी उपस्थितांसह, छत्रपती शिवरायांच्या स्तुतीपर रचना तथा प्रार्थनेचे पठण केले. पूजा संपन्न झाल्यानंतर सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका अन्वेषा आचरेकर, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, दत्ता नेरकर, सूर्यकांत फणसेकर व मान्यवरांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने जाणलेली, मालवणच्या विशेष ऐतिहासिक 'मोरयाचा धोंडा' वरील विविध धार्मिक, अध्यात्मिक व भौगोलिक प्रतिकात्मक चिन्हांची महती जपली जावी आणि ती सर्वांना समजावी असे आग्रहपूर्वक आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी त्यांच्या विशेष संबोधनाद्वारे केले.
यावेळी तहसीलदार गणेश लव्हे यांनी ह्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथील पूजेच्या सहभागाबद्दल प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी स्वागतासह प्रास्ताविक केले व भाऊ सामंत यांनी छत्रपती शिवरायांप्रती सर्वांगीण कृतज्ञेसह आभार प्रदर्शन केले.
ह्या सोहळ्याला मान्यवरांसह हेमंत वालकर, नारायण धुरी, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, दादा वेंगुर्लेकर, किसन मांजरेकर, सुंदर चांदेरकर, सिद्धेश तेंडुलकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीचे सदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)