ताज्या बातम्या
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.

जाहिरात

देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त.

Article image

मंत्री नितेश राणे यांचे बारीक लक्ष व कठोर भूमिका आणि मत्स्य विभागाच्या सातत्यपूर्ण सजगतेबद्दल स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान.


पंधरा दिवसांच्या आत 'शीतल' गस्तीनौके द्वारे विभागामार्फत दुसरी कारवाई.


देवगड | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पंधरा दिवसांत दुसरी कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील 'हनुमा ध्याना' ही हायस्पीड ट्रॉलर नौका देवगडसमोरील सागरी हद्दीत पकडून जप्त करण्यात आली. ही नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची 'झिरो टाॅलरन्स' भूमिका आणि ही सिंधुदुर्गचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.


१८ नोव्हेंबर २०२६ च्या उत्तर रात्री सुमारे ०२.०० वाजता सुनियोजित गस्तीदरम्यान ही कारवाई झाली. आचरा समोरील समुद्रात सुमारे ९-१० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाची नौका पाहताच सदर नौकेने पळ काढला होता. सदर हायस्पीड नौकेस पाठलाग करून देवगड समोरील समुद्रात पकडण्यात आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ आणि सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार नौका पाठलाग करून ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.


हायस्पीड ट्रॉलर नौकांकडून स्थानिक मच्छिमार यांची जाळी तोडली जात असल्याची तक्रार मालवण व देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी केली होती. त्यानंतर विभागाने सक्रियपणे मलप्पी बंदरातील महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या नोकांविरुद्ध नो टोलनस पॉलिसीचा सातत्याने अवलंब केला आहे. मलपे येथील मासेमारी नौका अधिक आश्र्वशक्ती क्षमतेची असल्याचे समजते. तरीही अधिकाऱ्यांनी हार न मानता पाठलाग सुरू ठेवला आणि सुयोग्य तंत्रकौशल्ल्याचा वापर करून महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणारी मलप्पी येथील हायस्पीड ट्रॉलर नौका विभागाच्या ताब्यात आली.


मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरुद्ध त्यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे विभागाच्या कारवाईला बळ मिळाले असून स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


सदर कार्यवाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अंमलबजावणी अधिकारी (म.वि.अ.) श्री. प्रतिक महाडवाला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 'शीतल' गस्ती नौकेद्वारे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सागरी सुरक्षा रक्षक दिवाकर जुवाटकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी त्यांना महत्त्वपूर्ण सहकार्य केले.


रात्रीच्या अंधारात भर समुद्रात, अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे सोपे नव्हते. अधिकाऱ्यां मार्फत १५ दिवसांत दुसऱ्यांदा केलेली कारवाई ही सुयोग्य नियोजन, तंत्रकौशल्य आणि कर्तव्यनिष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे. परप्रांतीय नौकेवर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यावरून विभागाची कारवाई सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध असल्याचे स्पष्ट होते. या कारवायांमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित सुरक्षित राहत आहे आणि सागरी जैवविविधतेचेही प्रभावी संरक्षण होत आहे. यामुळे स्थानिक मच्छिमार निर्धास्तपणे मासेमारी करू शकतील, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे. बेकायदा मासेमारीविरुद्ध 'नो टाॅलरन्स पॉलिसी‘ यापुढेही कायम राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स