ताज्या बातम्या
मालवण ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव आणि श्री देव नारायण जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!'

जाहिरात

मालवण ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव आणि श्री देव नारायण जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

मालवण ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव आणि श्री देव नारायण जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

मालवण ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव आणि श्री देव नारायण जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी. 

Article image

मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथे ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव (त्रिपुरारी पौर्णिमा) आणि श्री देव नारायणाचा जत्रोत्सव मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी भक्तीपूर्वक उत्साहात साजरा होणार आहे.


यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदंड सिंधुदुर्ग किल्ल्यावरून वाजत-गाजत मालवणमध्ये आणला जाणार आहे. रात्री ९.३० वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथून पालखी श्री देव नारायण मंदिराकडे प्रस्थान करेल. यावेळी मंदिरात पोथीपूजन व पुराणवाचनाचा कार्यक्रम होणार आहे.


या उत्सवानिमित्त श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देव रामेश्वर आणि श्री देवी सातेरी या मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जाईल. तसेच रात्री पालखी मिरवणूक आणि दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून, पहाटे या उत्सवाची सांगता होईल. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स