ताज्या बातम्या
टीम 'शीतल'च्या गस्तीची वाढती धास्ती ....! 'गाथेचे पुस्तकांनी वंदन...!' मालवण ग्रामदैवतांचा वार्षिक दीपोत्सव आणि श्री देव नारायण जत्रोत्सव २४ नोव्हेंबर रोजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे

जाहिरात

टीम 'शीतल'च्या गस्तीची वाढती धास्ती ....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

टीम 'शीतल'च्या गस्तीची वाढती धास्ती ....!

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

टीम 'शीतल'च्या गस्तीची वाढती धास्ती....!

Article image

देवगड समुद्रात मध्यरात्री कर्नाटकचा हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ वर कारवाई.

Article image


बेकायदेशीर मच्छिमारी विषयक मंत्री नितेश राणे यांच्या 'नो टाॅलरन्स' धोरणाची मत्स्य व्यवसाय विभागामार्फत कठोर अंमलबजावणी.


देवगड | प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा ट्रॉलिंग करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने 'शीतल' गस्ती नौकेच्या सहाय्याने आणखी एक कठोर आणि धाडसी कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदराची हायस्पीड ट्रॉलर ‘श्री अनघा’ देवगडसमोरील समुद्रात पकडून जप्त करण्यात आली. ही कारवाई देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘नो टॉलरन्स’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या अंधारात ही कारवाई पार पडली.

 

२३ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १२.२५ वाजता सुनियोजित गस्तीदरम्यान देवगडसमोर सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर ‘श्री अनघा’ वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका ‘शीतल’ दिसताच सदर ट्रॉलरने ताबडतोब वेग वाढवला आणि अंधारात पळ काढला. मागावरून सुटण्यासाठी नौकेवरील दोरखंड आणि जाळे गस्ती नौकेकडे फेकण्यात आले. यामुळे गस्ती नौकेच्या प्रोपेलरमध्ये जाळे अडकण्याची भीती निर्माण झाली. एका निर्णयामुळे गस्ती नौकाच अपघाताग्रस्त होण्याची शक्यता होती. मात्र किरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा रक्षक यांनी संयम सोडला नाही. अंधारात, भर समुद्रात आणि अधिक वेगवान हायस्पीड ट्रॉलरच्या पाठलागातही त्यांनी योग्य तंत्रकौशल्य वापरत सातत्याने पाठपुरावा केला. 


तासाभराच्या थरारक पाठलागानंतर शेवटी ‘श्री अनघा’ देवगडसमोरील समुद्रात ताब्यात घेण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ आणि सुधारित अधिनियम, २०२१ अंतर्गत नौका जप्त करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. कालमाडी बोट्टला, मल्पी, कोडावूर, उडपी मलप्पे बंदरातील या नौका अधिक अश्वशक्ती क्षमतेच्या असल्याचे समजते. मालवण आणि देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी हायस्पीड ट्रॉलरमुळे त्यांच्या जाळ्या तोडल्या जात असल्याची वारंवार तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर विभागाने महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात मासेमारी करणाऱ्या अशा नौकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे.


ही संपूर्ण कारवाई देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे पार पाडली. सागरी सुरक्षा रक्षक संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर, योगेश फाटक, अमित बांधकर आणि स्वप्नील सावजी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. कारवाई सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.


कारवाइनंतर किरण वाघमारे यांनी स्थानिक मच्छिमारांच्या हिताचे रक्षण आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे स्पष्ट करताना बेकायदा मासेमारी करणाऱ्या कोणत्याही नौकेला अभय मिळणार नसल्याचे सांगितले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या कडक धोरणाची अंमलबजावणी आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. स्थानिक मच्छिमार आता निर्धास्तपणे मासेमारी करू शकतील असेही ते म्हणाले.


रात्रीच्या अंधारात भर समुद्रात अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे हे सोपे काम नव्हते. सुयोग्य नियोजन, तंत्रकौशल्य आणि कर्तव्यनिष्ठेमुळे ही कारवाई यशस्वी झाली. यामुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित सुरक्षित राहत असून सागरी जैवविविधतेचेही प्रभावी संरक्षण होत आहे. बेकायदा मासेमारीविरुद्ध ‘नो टॉलरन्स’ धोरण कायम राहील, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स