ताज्या बातम्या
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी. मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात. देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देऊ पहाणारा जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम. कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग.
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी.

रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी.

Article image

१७ वर्षांखालील मुलांच्या संघाचे जेतेपद आणि १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे उपविजेतेपद.


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेने दुहेरी चषकीय कामगिरी केली आहे. ही स्पर्धा मालवण तालुक्यातील चौके येथील भ. ता. चव्हाण हायस्कूल पटांगणावर खेळवली गेली.


१७ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात रोझरी इंग्लिश स्कूलने यजमान चौके हायस्कूलच्या संघाचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले आणि त्या उल्लेखनीय विजयासह जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या १७ वर्षांखालील संघाची निवड निश्चित केली. आता हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.


१४ वर्षांखालील मुलांच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली. अंतिम सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि त्यांना उपविजेतेपद प्राप्त झाले. क्रीडा प्रशिक्षक मेलवीन फर्नांडिस आणि विशाल भगत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांनी दोन्ही संघांचे अभिनेदन केले. दोन्ही संघांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेमार्फत त्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांनी १७ वर्षांखालील मुलांच्या संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सदिच्छा दिल्या. 


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे व सहकारी यांचे विवेष प्रयत्न, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या सदिच्छा तसेच मुलांचा समर्पित सराव ह्या व अशा घटकांमुळे रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या परिणामकारक प्रयत्नांनी मैदानी खेळांमधला त्यांचा उंचावणारा आलेख हा प्रशंसेचा ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.

लोकप्रिय टॅग्स