ताज्या बातम्या
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. कणकवलीत गिरिजा प्रभुदेसाई यांचा 'कथक' नृत्य वंदना कार्यक्रम. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात. पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश. रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी. मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात.

Article image


सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड यांचे वाचन आणि लेखन यांच्या परस्पर संबंधांबद्दल मार्गदर्शन.


मालवण | प्रतिनिधी : भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी डॉ. विठ्ठल गाड यांची मार्गदर्शनपर उपस्थिती होती तर व्यासपीठावर भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे कमिटी मेंबर यश केरकर, कॉन्सिल सदस्य रामदास मयेकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक आर. डी बनसोडे, सहाय्यक शिक्षिका सौ. संजना सारंग, वाचन सातत्य आग्रही ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आणि विविध मान्यवर उपस्थित होते.


मुख्याध्यापक आर डी बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. सारंग यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला 


यावाळी मार्गदर्शन करताना साहित्यिक डाॅ. विठ्ठल गाड यांनी कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी वाचन आवश्यकता असल्याचे सांगितले. वाचनामुळे आपल्या कल्पनाशक्तीला फुटणारे नवनवे कंगोरे तसेच लेखक किंवा साहित्यिक बनण्यासाठी पुस्तके वाचनाची महती समजावली. तसेच ध्येयनिश्चितीसाठी साहित्यनिर्मितीसाठी योग्य विषय निवडून त्याचा सखोल अभ्यास करायचा डाॅ. गाड यांनी विशेष आग्रह केला. 


डॉ. विठ्ठल गाड यांनी वाचन आणि लेखन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करताना, साहित्य निर्मितीसाठी शब्दांच्या ज्ञानासोबतच विषयाचा अभ्यास, निरीक्षण, चिंतन आणि सातत्यपूर्ण वाचनाची गरज स्पष्ट केली.

'शब्दांच्या मागे धावता, तेव्हा शब्द तुमच्याकडे येतात. ते तुमच्या जवळ येतात, तुमचे मित्र बनतात आणि त्यातूनच साहित्याचा जन्म होतो,' अशा शब्दाशयातून विद्यार्थ्यांना त्यांनी लेखनाची प्रेरणा दिली. आपल्या मनातील कल्पनांना शब्दरूप देण्यासाठी वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले.



यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश केरकर यांनी आजच्या डिजिटल युगात वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासावर आणि संवाद कौशल्यावर होत असलेले परिणाम याबाबत त्यांचे विचार मांडले. वाचनामुळे शब्दसंपदेत वाढ, वैचारिक दिशाप्राप्ती आणि व्यक्तिमत्त्व विकास यांना चालना मिळवण्याची संधी उपलब्ध होते असा त्यांच्या संबोधनाचा उद्देश त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज काही वेळ पुस्तकांसाठी देऊन वाचनाची सवय लावून घ्यायच्या विशेष आवाहनासह केला. 



डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कथाकथन, निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली त्याचे पारितोषिक वितरण पार पडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. शिक्षिका सौ. अस्मिता वाईरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स