मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात.
मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर चुरशीच्या लढती रंगल्या.
मालवण | प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुला - मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जी. व्ही. सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी कुस्ती क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे, पर्यवेक्षक देविदास वेरलकर, प्रफुल्ल सामंत, निशाकांत पराडकर, अन्वेषा कदम, राजेश आजगावकर, अमेय बादेकर उपस्थित होते. दोन दिवस चाललेली ही स्पर्धांमध्ये १४, १७ व १९ वर्षांखालील शालेय गटात खेळवली गेली.
१४ वर्षांखालील मुलांमध्ये टोपीवाला हायस्कूल मालवण, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, जयगणेश ई. मि. स्कूल मालवण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
१४ वर्षांखालील मुलींमध्ये जयगणेश ई. मि. स्कूल, मालवण, सेंट उर्सुला ई. मि. स्कूल कणकवली, मिलाग्रीस ई. मि. स्कूल सावंतवाडी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
१७ वर्षांखालील मुलांमध्ये जयगणेश ई. मि. स्कूल, मालवण, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, मिलाग्रीस ई. मि. स्कूल सावंतवाडी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
१७ वर्षांखालील मुलींमध्ये जयगणेश ई. मि. स्कूल मालवण, मिलाग्रीस ई. मि. स्कूल, सावंतवाडी, सेंट उर्सुला ई. मि. स्कूल, कणकवली यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
१९ वर्षांखालील मुलांमध्ये भंडारी ए. सो. ज्युनियर कॉलेज मालवण, टोपीवाला ज्युनियर कॉलेज मालवण, डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज ओरोस यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
१९ वर्षांखालील मुलींमध्ये टोपीवाला ज्युनियर कॉलेज मालवण, रामभाऊ परुळेकर ज्युनियर कॉलेज मालवण, रोझरी ई. स्कूल मालवण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेसाठी काम पाहिलेले पंच तसेच सामनाधिकारी म्हणून अजय शिंदे, निशाकांत पराडकर, अभिजीत खानोलकर, कॅलिस फर्नांडिस, विनायक चव्हाण, जेरी फर्नांडिस, प्रसाद चव्हाण, दिनेश चव्हाण, किरण राठोड, अमेय बादेकर, पी. एम. सामंत, मेघश्याम लाड, गणेश चोपडेकर, प्रल्हाद नाईक यांनी जबाबदारी भूषविली.
या स्पर्धांमधील विजेतेपद प्राप्त मुला - मुलींचे संघ दिनांक १३, १४ व १५ ऑक्टोबर २०२६ रोजी वारणानगर येथे होणाऱ्या विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन अध्यक्ष अण्णासाहेब सकपाळ, कार्याध्यक्ष विजय मागाडे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी.
रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो ...
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत...
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर म...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये मान्सून स्पोर्ट्स उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये मान्सून ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या