सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा 'पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात' समावेश.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा 'पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात' समावेश.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र. एस.ओ. ४१०६ (E), दि. २७ जुलै २०२६ अन्वये मसुदा अधिसूचना जारी केली आहे. ही मसुदा अधिसूचना भारत सरकारच्या ई-गॅझेट संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमधील २ हजार ५१५ गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा समावेश आहे.
या प्रस्तावित अधिसूचनेमुळे ज्या स्थानिक रहिवासींना त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यांना पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ व त्याअंतर्गत नियमांतील तरतुदीनुसार मसुदा अधिसूचनेबाबत आपले आक्षेप, सूचना व हरकती नोंदविता येणार आहेत.
संबंधितांनी आपले आक्षेप मसुदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे सादर करावेत. यासाठी es-z-mef@nic.in या ई-मेलवर किंवा केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली-११०००३ या पत्त्यावर आक्षेप नोंदविता येतील.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)