ताज्या बातम्या
कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...! वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..! उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल.
कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.

कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.

Article image

मान्यवरांकडून 'दशावतार' संकल्पनेची मुक्तकंठाने प्रशंसा.


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : 'कोकणसाद' ह्या प्रसिद्ध प्रसार माध्यम यंत्रणेच्या २०२६ सालच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. एका विशेष सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची उपस्थिती होती. 



कोकणसादच्या यंदाच्या दिवाळी अंकाची 'दशावतार' आधारित संकल्पना असून हा अंक वैविध्यपूर्णतेसह दशावतार कलावंतांच्या योगदानाला न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे.


कोकणसादच्या मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या ह्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, कोकणसाद मीडियाचे संपादक संचालक संजय ढवळीकर, कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, दशावतार कलावंत गौरव शिर्के यांच्यासह टीम कोकणसादचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते. 

या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी विशेष मनोगत व्यक्त करताना दैनिक कोकणसादच्या अंकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली तसेच या अंकाला यंदाही राज्य शासनाचा पुरस्कार मिळण्याच्या शुभेच्छा दिल्या. 


यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी कोकणसादनं यंदाच्या दिवाळी अंकात दशावतार कलेला दिलेल्या स्थानाचे कौतुक केले. हा अंक दशावताराची समृद्ध परंपरा सांगणारा एक दस्तऐवज आहे असे सांगताना त्यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्यातील कलावंतांची छायाचित्रे आणि मांडणी पाहिल्यानंतर दशावतार कलेच मोठेपण लक्षात येतं आणि कोकणसादनं या माध्यमातून दशावतार परंपरेच महत्त्व अधोरेखित केलं आहे असे स्पष्ट केले. कोकणसाद हा जनसामान्यांपर्यंत पोहचलेला प्रसार समूह असल्याची प्रशंसा आमदार दीपक केसरकर यांनी केली.


याप्रसंगी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मालवणी भाषेला मराठी भाषा विभागात समाविष्ट करून तिच्या विकासासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची मागणी केली. तसेच कोकणसाद हा 'नंबर वन' चे मीडिया असून एका उंचीवर चॅनेल पोहचले आहे असे सांगताना आपण या चॅनेलचा सबस्क्राईबर असल्याचे आमदार निलेश राणे यांनी आवर्जून नमूद केले.  


मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दिवाळी अंकाच्या दशावतार या विषय निवडीमागील संकल्पना विषद केली. कोकणसाद मीडियाचे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी उपस्थित मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. उपसंपादक अनुजा कुडतरकर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स