ताज्या बातम्या
'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात. श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्याकडून 'दिवाळी २०२६' च्या अभ्यंगस्नानासाठी उटणे वाटप. मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ. जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट. कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...!
'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...!

'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...!

Article image

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त.


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : दिवाळी सण २०२६ च्या पार्श्वभूमीवर मिठाई, फराळ व अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. पाच दिवस चाललेल्या या मोहिमेत एकूण १३ तपासण्या करून १७ अन्न नमुने संकलित करण्यात आले. या कारवाईत संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची एकूण किंमत ४३ हजार ५८५ रुपये आहे.


या मोहिमेदरम्यान कुडाळ येथे ९८ किलो मावा, किंमत ३९ हजार २०० रुपये, तर कणकवली येथे ६ किलो खवा, किंमत २ हजार १४५ रुपये जप्त करण्यात आला. याशिवाय कणकवली येथे ३ किलो पोहा चिवडा आणि ५ किलो शेव चिवडा, असा एकूण ८ किलो फराळाचा साठा, किंमत २ हजार २४० रुपये, जप्त करण्यात आला.


मोहिमेत मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, खवा-मावा, मिठाई आणि फरसाण यांचे नमुने घेण्यात आले. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधित विक्रेते व उत्पादकांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग यांनी दिली.


सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई व फराळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे, अन्नपदार्थांची मुदत तपासावी तसेच अनैसर्गिक गडद रंगाचे पदार्थ खरेदी करणे टाळावे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याची शंका आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


बॅलन्स्ड डाएट फूडसाठी प्रयत्नशील रहाताना 'डाऊट फूड' बाबत सदैव सजग रहाण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया खाद्य व आरोग्य जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स