ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकाच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकाच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकाच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

Article image


जागेची तत्काळ स्थळपाहणी व मोजणी पूर्ण करण्याचे निर्देश.


संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांचे स्मारक मालवण तालुक्यातील मौजे पराड या त्यांच्या वडिलांच्या मूळ गावी उभारण्याचा राज्य शासनाचा तत्त्वतः मंजूर प्रस्तावावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकासाठी जागेची स्थळपाहणी करून मोजणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. ग्रामस्थांशी विचारविनिमय करून सुचवलेल्या पर्यायी जागांची पाहणी करावी व त्यांपैकी एक जागा अंतिम करावी. तसेच जागेची मोजणी आणि तज्ज्ञांची नेमणूक यांसारख्या प्रक्रिया वेगाने पूर्ण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, बांधकाम व वित्त सभापती संतोष साटविलकर, काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राममोहन पाठक, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कार्यकारी अभियंता डी. बी. बागुल, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, नगररचना विभागाचे सहायक संचालक रवींद्र बनसोड आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.


संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांचे स्मारक मालवण तालुक्यातील मौजे पराड या त्यांच्या वडिलांच्या मूळ गावी उभारण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव असून, या स्मारकास शासनाने यापूर्वीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. स्मारकासाठी जागा निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी योग्य जागेची निवड करून पुढील कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश दिले होते.


बाबुराव विष्णू पराडकर यांचे वडील काशी येथे स्थायिक झाले होते. बाबुरावांचा जन्म काशीत झाला असला तरी मराठी मुळांशी जोडलेल्या या सुपुत्राने हिंदी पत्रकारितेत अद्वितीय आणि अमूल्य योगदान दिले. त्यांनी हिंदी पत्रकारितेत ३०० हून अधिक नवीन पारिभाषिक शब्द रूढ केले, अशी माहिती काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राममोहन पाठक यांनी यावेळी दिली.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्...

03 Sep 2026 160

लोकप्रिय टॅग्स