ताज्या बातम्या
मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...! वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..! उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल. खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी.
मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड.
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड.

मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 

Article image

अध्यक्षपदी मंदार चव्हाण आणि उपाध्यक्षपदी मंगेश साळसकर तर सचिवपदी मिहिर राणे.


मालवण : मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अध्यक्षपदी असगणी गावचे सुपुत्र मंदार चव्हाण यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी मंगेश साळसकर तर सचिवपदी मिहिर राणे यांची निवड करण्यात आली आहे. ओरोस येथे, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झालेल्या मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या बैठकित सर्वानुमते नूतन कार्यकारिणी निवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणून रोहित भोसले, ऋतुराज शिर्के, कुणाल सावंत व कन्हैया गावडे यांचा समावेश आहे. 


या बैठकीत नूतन कार्यकारिणी स्थापनेसह विकासकामे व शासनाचे नवीन जीआर यावर चर्चा करण्यात आली. सर्व सुबे अभियंत्यांनी यावेळी नियोजन व सहकार्य केले.


नूतन अध्यक्ष मंदार चव्हाण यांनी या निवडीनंतर त्यांच्या सर्व सहकारी सदस्य व पदाधिकारी बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नूतन अध्यक्ष मंदार चव्हाण यांनी त्यांच्या यापूर्वी अनुभवलेल्या सचिवपदाच्या जबाबदारीचा उपयोग आगामी काळात अध्यक्ष म्हणून काम करताना होणार असल्याचे सांगत सर्व सहकारी सदस्य बांधवांची साथ घेऊन संघटनात्मक सक्षमता व सदस्यांच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला आहे. 


नूतन कार्यकारिणी निवडीनंतर नूतन अध्यक्ष मंदार चव्हाण, नूतन उपाध्यक्ष मंगेश साळसकर, नूतन सचिव मिहिर राणे आणि नूतन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी दादा नाईक, मनोज वायंगणकर, सागर माळवदे, प्रसाद आंगणे, अभिषेक डिचोलकर, प्रसाद ढवळे, किरण राठोड, गीतेश खेडेकर, भाऊ अपराध, सतीश राठोड, कौस्तुभ आंगणे आदि मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स