ताज्या बातम्या
मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...! वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..! उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल. खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी.
'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


Article image


स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रचार विभाग' अध्यक्ष अरविंद प्रभू, कार्याध्यक्ष सुभाष पेठे, कार्यवाह केशव परांजपे, कोषाध्यक्ष विनायक जोशी तसेच उद्योजक डाॅ. दीपक परब व संजय सावंत यांच्या परिश्रमातून आयोजित प्रकल्प.


​मसुरे | प्रतिनिधी : अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलमधील आठवणी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाची गाथा सध्या मुंबईकरांना, विलेपार्लेकरांना अनुभवता येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रचार विभागातर्फे विलेपार्ले (पूर्व) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रात १ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 'वीर सावरकर जागर' या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


१ नोव्हेंबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याच दिवशी आयोजित किल्ला कार्यशाळेत लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत किल्ले साकारले. २ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन सर्वांच्या भेटीसाठी उपलब्ध आहे.


​तरुण कलाकारांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा.


जागराच्या समारोपाच्या दिवशी, म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि जीवन यावर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

​१० ते १८ वर्षे हा पहिला गट असून १९ वर्षे आणि त्यावरील स्पर्धकांचा दुसरा गट आहे.

​या स्पर्धेतील दोन्ही गटांतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि तरुण कलाकारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


​माहिती व संपर्कसाठी , 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, एम. जी. रोड, विलेपार्ले (पूर्व)' इथे सायंकाळी ६ वाजल्यापासून भेट देता येईल तर अधिक माहितीसाठी श्री. संजय सावंत ( ९८२०९५९५७२) यांना संपर्क साधता येऊ शकेल अशी माहिती मिळत आहे.


​या प्रकल्पाच्या आयोजनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रचार विभागाचे अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू, कार्याध्यक्ष श्री. सुभाष वि. पेठे, कार्यवाह श्री. केशव द. परांजपे, कोषाध्यक्ष श्री. विनायक कृ. जोशी तसेच उद्योजक श्री. दीपक परब आणि श्री. संजय सावंत हे विशेष परिश्रम घेत आहेत. मुंबईकर तरुणांनी आणि पार्लेकर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वातंत्र्यवीरांचा हा जागर पुढे नेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

​

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स