उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..!
उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी...!
मालवणचे श्री. अमित खोत वाढदिवस विशेष
विशेष : मालवणचे श्री. अमित खोत..!
अमित खोत यांचा २००७ साल पर्यंत एक हसरा, विचारी आणि मितभाषी संस्कारी मुलगा - युवक असा परीचय होता. त्या दरम्यान, बाजारपेठेत एक व्यावसायिक दुकानगाळा घेत त्यांनी व्यापारी क्षेत्रातून स्वतःच्या कारकिर्दीचे पदार्पण केले. त्यांना व्यापारी क्षेत्रात तितकासा रस घेता आला नाही कारण त्यांचा आत्मा हा 'सदैव सर्व लोकाभिमुख कार्यरत' अशा वृत्तीचा आहे आणि तशीच त्यांची दृष्टी सुद्धा...!
अमित यांच्या दृष्टीला, पत्रकारिता क्षेत्राने त्यांच्या उत्तर युवा वयात माहिती, तंत्रज्ञान आणि सामाजिक शिष्टाचारांच्या जाणीवांनी प्रगल्भता दिली. त्यांचे हसरे स्वप्निल डोळे शोधक वृत्तीने भारले आणि त्यांना त्यांची अशी उजळती दृष्टी व दृष्टीकोन गवसत गेले. त्यांची व्यापार, संस्कृती, सामाजिक निती यामधून स्वयंपूर्ण सर्जनशीलता विकसीत झाली.
अमित खोत यांचा गेल्या १८ वर्षांतील जीवनप्रवास एका मीतभाषी मालवण शहरवासी युवक ते निर्भय पत्रकार बनलेल्या कणखरतेचा आहे....सोबतच प्रसन्न आदर्शाचा सुद्धा...! त्यांच्या सानिध्यातल्या घटकांबद्दलची त्यांच्यात असलेली आदराची वृत्ती ही त्यांच्या उजळत्या दृष्टीसोबत स्वप्नवत सृष्टी घडवत गेली आणि आजही जात आहे.
आज ३ नोव्हेंबर रोजी श्री. अमित खोत यांना त्यांच्या आदरवृत्तीतून व उजळत्या दृष्टीतून स्वप्नवत सृष्टीच्या दीर्घ व निरामय प्रवासाला विविध स्तरातून सदिच्छा देण्यात येत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
आपापल्या 'कालिंदीं'साठीच्या प्रदूषणरूपी कालियाच्या पाच फण्यांची ओळख ....!
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..!