माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद.
माजी आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्याशी भेट व चर्चा.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व आपला दवाखाना येथे महालॅबमार्फत सुरू असलेली प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा बंद झाली असून ही सेवा देणाऱ्या एचएलएल कंपनीची दोन वर्षापासूनची देयके महायुती सरकारने थकीत ठेवल्याने ही सेवा बंद झाली आहे त्यामुळे रुग्णांना खासगी तपासण्या कराव्या लागत असून त्याचा खर्च परवडत नसल्याने गरीब व गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे, असा आरोप करत कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवर चर्चा करुन प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली.
या मागणीला आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सेवा लवकरात लवकर सुरु करण्याची ग्वाही दिली अशी माहिती मिळत आहे. यावेळी शिवसेना आडवली मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, भगवान परब उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्र...
विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात.
विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...