ताज्या बातम्या
मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ. जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट. कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...! वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..!
मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ.
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ.

मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ.

Article image


मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून, नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते मालवण बंदरजेटीवरच्या 'प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी' अत्यावश्यक असणारी 'नियमित व मुबलक' पाण्याची सोय लक्षात घेता बोअरवेल उभारणीसाठी खोदकामाचा, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी शुभारंभ करण्यात आला आहे. पर्यटक, स्थानिक, व्यापारी यांची वर्दळ असलेल्या मालवण बंदरजेटीवरील प्रसाधनगृहात जास्त प्रमाणात आवश्यक असलेली पाण्याची गरज लक्षात घेऊन तसेच तिथल्या पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी असुविधा व अस्वच्छता दूर करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशाने नगरपरिषदेच्या माध्यमातून बोअरवेल उभारणीचे हे काम हाती घेण्यात आले आहे. या बोअरवेल खोदाई कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.


या बोअरवेल खोदाई कामाच्या शुभारंभप्रसंगी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, उद्योजक मोहन वराडकर, माजी नगरसेवक जॉन नरोना, भाई मांजरेकर, कमलेश कोचरेकर, संदीप मालंडकर असे मान्यवर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स