ताज्या बातम्या
कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...! वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..! उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल.
आयडॉलचा आयडियल सन्मान...!
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आयडॉलचा आयडियल सन्मान...!

आयडॉलचा आयडियल सन्मान...!

Article image

ओसरगाव क्र. १ प्रशालेचे शिक्षक किशोर कदम यांचा 'आयडॉल टीचर' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने विशेष गौरव.


मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओसरगाव क्र. १ चे प्राथमिक शिक्षक किशोर देऊ कदम यांना 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद' तर्फे प्रदान करण्यात येणारा ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा अभिनंदनपर गौरव करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिवबा अपराज, मुख्याध्यापिका शितल दळवी, नयन आलव, राजश्री तांबे, प्रमिता तांबे,अंगणवाडी सेविका येरलकर मॅडम, सुषमा आलव, सर्व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी एका 'आयडॉलचा आयडियल सन्मान' होत असल्याच्या आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली.



शिक्षक किशोर कदम यांच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्याची महत्त्वपूर्ण दखल घेतली गेली आहे. यापूर्वी त्यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांची, ‘युगनायकांची जीवनगाथा’ आणि बालकवितासंग्रह ‘बालविश्व’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना जिल्हास्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत समाजशास्त्र विषयावरील व्हिडिओला प्रथम क्रमांक मिळाला आहे. कणकवली महाविद्यालयात आयोजित इतिहास संशोधन कार्यशाळेत त्यांनी सादर केलेला ‘मुक्ता साळवे’ हा निबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या पुढाकाराने बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच राजे प्रतिष्ठान सिंधु यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी धनुर्विद्या, मल्लखांब आदी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.


त्यांच्या या यशाबद्दल ओसरगावच्या सरपंच सुप्रिया कदम, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष ॲड. विलास परब आणि केंद्रप्रमुख पंढरीनाथ तेंडोलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स