ताज्या बातम्या
'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात. श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्याकडून 'दिवाळी २०२६' च्या अभ्यंगस्नानासाठी उटणे वाटप. मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ. जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट. कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात.

Article image

जिल्हा परिषद, प्रशासन, प्रशाला, गोशाळा व गोपालक संघांचा सहभाग.


श्री गोपाळकृष्ण गोपालक संघाने केले होते विशेष आवाहन.


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिपावली पर्व २०२६ पार्श्वभूमीवर वसु बारस उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. वसु बारस उत्सवाद्वारे गाय तथा गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या विशेष सहकार्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसुबारस कार्यक्रम व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आले तसेच प्रशासन, शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, गोपालक संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी झाला अशी माहिती 'श्री गोपाळकृष्ण गोपालक संघ' यांच्या वतीने भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे दिली आहे. संपूर्ण जिल्ह्यात वसुबारस कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री गोपाळकृष्ण गोपालक संघाच्या वतीने विशेष आवाहन करण्यात आले होते.


जिल्हाभर वसुबारस कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी श्री गोपाळकृष्ण गोपालक संघाच्या वतीने चंद्रशेखर पुनाळेकर, प्रसन्ना देसाई , भालचंद्र राऊत, गोविंद फणसेकर, रुपाली देसाई, स्नेहल पेडणेकर, दिव्या तळेकर, भार्गवी परब, संदेश बांधकर आणि अनिल वारंग यांनी विशेष मेहनत घेतली.


जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खासगी शाळांमध्ये वसुबारस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, गोमातेचे महत्त्व, गोसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धन यांची माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. शाळांमध्ये राज्यमाता गोमातेचे पूजन करून तिच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Article image


जिल्हापरिषद अध्यक्ष प्रमोद कामत वसुबारस उत्सवाच्या निमित्ताने मनोभावे गोपूजन करतानाचा क्षण....


शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून चित्रभरण स्पर्धा, गोमातेच्या महत्त्वावर आधारित व्याख्याने, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. यामाध्यमातून शालेय वयापासून विद्यार्थी विद्यार्थिनींना भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि पशुप्रेमाची सात्विकता व महती समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असे भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी कळवले आहे  


वसुबारस कार्यक्रम विविध प्रशालांसोबतच जिल्ह्यातील नगरपरिषदा, गोपालक संघ आणि विविध गोशाळांमध्येही उत्साहाने साजरा करण्यात आला. गोमातेचे पूजन, तिच्या संवर्धनाचे महत्त्व सांगणारे व्याख्यान आणि गोसेवेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचे उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे शेतकरी वर्गातून मोठा प्रतिसाद या कार्यक्रमासाठी लाभला. 


गोमातेचे संरक्षण, गोवंशाचे संवर्धन, गोशाळांचे महत्त्व आणि भारतीय परंपरेतील गोमातेचे स्थान याविषयी समाजामध्ये सकारात्मक जागृती निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विविध संस्थांच्या सहभागामुळे वसुबारस उत्सवाला सामाजिक आणि शैक्षणिक स्वरूप प्राप्त झाले असे भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी स्पष्ट केले आहे.


श्री गोपाळकृष्ण गोपालक संघाच्या वतीने चंद्रशेखर पुनाळेकर यांनी या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, संस्थांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच सर्व नागरिकांचा विशेष उल्लेख करण्यात आला.




(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स