श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्याकडून 'दिवाळी २०२६' च्या अभ्यंगस्नानासाठी उटणे वाटप.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्याकडून 'दिवाळी २०२६' च्या अभ्यंगस्नानासाठी उटणे वाटप.
मालवण : यंदाच्या दिवाळी सणाचे औचित्य साधून, मालवण तालुक्यातील आचरा विभागातल्या 'श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब' यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे गावातील ग्रामस्थांना अभ्यंगस्नानासाठी 'उटणे वाटप' करण्यात आले. दिवाळी हा आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान व आरोग्य नांदावे, या सद्भावनेतून मंडळाने हा उपक्रम राबविला असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
यावेळी ग्रामस्थांचे उत्तम आरोग्य, कुटुंबातील सुख - समृद्धी आणि गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच गावातील सामाजिक सलोखा, एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
सण - उत्सवांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम मंडळाकडून सातत्याने केले जात आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे गावातील सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मता टिकून राहण्यास मदत होत आहे.
यंदाच्या उटणे वाटप उपक्रमात जिजी सावंत, देऊ सावंत, अनिल परब, शिवराम पुजारे, दिवाकर पुजारे, रमेश मुणगेकर, मंडळाचे खजिनदार वैभव परब, अमित पुजारे, अक्षय परब, संतोष परब, सोमा लाड, वेदांत सावंत, अनुज गोलतकर, राजा पुजारे, मंथन मुणगेकर, विकी पुजारे, संतोष परब, मिहिर परब, अर्णव गोलतकर आणि विविध मान्यवरांसह मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ज्येष्ठ समाजसेविका वंदना करंबेळकर यांना 'कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक' पुरस्कार जाहीर.
आचरा तिठा येथे २५ ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत नारळ लढवणे स्पर्धा.
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसु बारस उत्सव उत्साहात.