श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य.
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य.
श्री गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त.
मालवण | प्रतिनिधी : श्री गणेशोत्सव २०२६ सणामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या, श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने, श्री गणेश भक्तांसाठी श्री गणेश मूर्ती विसर्जनास विशेष सक्रीय सहकार्य केले. दरवर्षी या पथकाचे सदस्य, मालवण समुद्र किनारा व परिसरातील श्री गणेश मूर्तींच्या विसर्जन सेवेसाठी यथाशक्ती थेट योगदान देतात. संध्याकाळचा अंधार, समुद्रातील लाटांचा मारा अशा घटकांमुळे श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वात, विसर्जनादरम्यान कोणताही अघटीत प्रकार अथवा अपघात होऊ नये म्हणून श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाचे सदस्य, श्री गणेश भक्तांची विशेष नियोजनपूर्वक काळजी घेत असतात.
यंदा या पथकात रोशन कांबळी, आशिष फर्नांडिस, भावेश बटाव, सोमा लांबोर, सुजल कदम, तन्मय राणे, प्रथमेश परब, तन्मय येमकर, ऋतिक बटाव, घनःशाम बटाव, बादल फर्नांडिस, राॅकी मिठबावकर, परेश वाघ, राजा बटाव, शंकर बटाव, इनो परेरा, जॅक परेरा, कार्तिक बटाव, गणेश राणे, यश देसाई, रॅक्स परेरा, सचित देसाई, दिपक कदम, सोहम हिंदळेकर, योगेश साळगावकर, रोहित सकपाळ, मनिष शिंदे, तेजस घारकर, रियांज, साहिल लवंदे, विकी लवंदे, ओंकार नाईक, गणेश राणे, सागर झोरे, सचिन झोरे, धनु साळगावकर, साहिल देसाई, सुयोग लांबोर, रुजाय फर्नांडिस, रॅल्वीस फर्नांडिस, अण्णा कदम, रूजाय उर्फ बबन वाघ व सदस्यांनी सक्रीय योगदान दिले.
श्री. हरी खोबरेकर यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याबद्दल विशेष प्रशंसा केली असून श्री गणेश भक्तांची गणेशोत्सवासाठीची मंगलमयता सुरक्षित राखण्यासाठी मंडळ नेहमीच प्राधान्य देत असते असे स्पष्ट केले.
श्री गणेश भक्तांकडून, श्री हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाबद्दल समाधान व कृतज्ञता व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)