ताज्या बातम्या
मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बंदरजेटीवरील प्रसाधनगृह वापर व देखभालीसाठी बोअरवेलच्या खोदकामाचा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते शुभारंभ. जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट. कोकणसादच्या 'दिवाळी अंक २०२६' चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. मालवण तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड. 'वीर सावरकर जागर' प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला आरोग्य मंत्र्यांचा दूरध्वनीवरून सकारात्मक प्रतिसाद. आयडॉलचा आयडियल सन्मान...! वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..!
जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट.
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट.

जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांची पळसंब येथील महापुरुष महिला समूहाच्या अंडी संकलन केंद्राला सदिच्छा भेट.

Article image

मालवण : आचरा जिल्हा परीषद सदस्य सौ. वर्षा मांगिरीष सांबारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान' (उमेद) अंतर्गत महापुरुष महिला समूहाच्या नव्याने सुरू झालेल्या अंडी संकलन केंद्राला ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. ह्यावेळी 'उमेद' आणि मंडळाचे मान्यवर उपस्थित होते.  


'महिला सक्षम तर कुटुंब सक्षम, आणि कुटुंब सक्षम तर गाव सक्षम,' अशा संदेशाद्वारे त्यांनी त्यांच्या ह्या विशेष भेटीची माहिती दिली आहे. या भेटीनंतर जि. प. सदस्य वर्षा सांबारी यांनी हा उपक्रम महिलांच्या हाताला काम, कष्टाला दाम आणि स्वावलंबनाला नवी दिशा देणारा असल्याचे नमूद केले असून या उपक्रमातील सर्व महिला भगिनी, बचत गट पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स