कर्तव्यदक्ष सम्राट सतिश सावंत यांनी सचिन सावंत रुपी चैतन्यासाठी विणली खंबीर मोलाची स्वयंरोजगार शिवण....!
अपघातात पाय गमावलेल्या युवा सचिन सावंतला सतीश सावंत यांनी दिला रोजगार साधनांचा आधार..!
कणकवली | उमेश परब | विशेष वृत्त : ‘सतिश आणि सचिन ही खरेतर भगवान शिवाचीच दोन रुपे…!’… त्यातील ‘सतिश’ या शब्दाचा अर्थ समाजमान्य जपणारा सम्राट, कार्यतेजस्वी राजा किंवा सर्वांना हसतमुख ठेवत स्वतः हसतमुख रहाणारा कर्तव्यदक्ष शासक असा आहे. नावाप्रमाणेच समाजभान जपणारी काही माणसे जेंव्हा दिसतात तेंव्हा नाममहात्म्याची प्रचिती आल्यावाचून रहात नाही..! अशीच एक सामान्य सामाजिक प्रचिती देत असामान्य कार्य नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सतिशमार्फत घडले आहे व “ते दातृत्वदायी सतिश” आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्केचे अध्यक्ष श्री.सतिश सावंत. http://localhost/news/public/uploads/2018 साली तोंडवली बावशी येथील युवक सचिन सावंत यांनी अपघातात आपला डावा पाय गमावला व सोबतच उजव्या पायाला ही अपंगत्व आल्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्याला स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आज इलेक्ट्रिक शिलाई मशीन उपलब्ध करून दिली यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, संदेश पटेल, राजू शेटये, आनंद ठाकूर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी बहुतांश युवकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे तोंडवली बावशी येथील युवक सचिन सावंत याने http://localhost/news/public/uploads/2018 मध्ये अपघातात पाय गमावल्याने त्याच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे त्याने जिल्हा बँक अध्यक्ष श्री सावंत यांच्याकडे आपल्याला शिलाई मशीन मिळाल्यास आपणास रोजगार मिळू शकतो असे सांगितल्याने सावंत यांनी त्याला इलेक्ट्रिक शिलाई मशीन उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे या मशीनचा उपयोग करून सचिन सावंत यांना भविष्यात स्वयंरोजगार उपलब्ध होणार असल्याने त्याने जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना नेत्यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)