ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
तोंडवळी - तळाशिल पर्यटन संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर.

तोंडवळी - तळाशिल पर्यटन संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर.

तोंडवळी - तळाशिल पर्यटन संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर.

Article image

अध्यक्षपदी संजय केळुसकर तर उपाध्यक्षपदी वासुदेव पाटील यांची निवड. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील तोंडवळी - तळाशिल परिसरातील स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तोंडवली - तळाशिल पर्यटन संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संजय केळुसकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी वासुदेव पाटील, सचिवपदी विजय पाटील, खजिनदारपदी सागर मालंडकर, सल्लागार तुकाराम (आबा) कांदळकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सदस्य म्हणून हनुमंत देऊळकर, संजय तारी, हर्षद पाटील, मनीषा पाटील, पुंडलीक टिकम, निपुण तांडेल आणि विकास पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.


तोंडवळी - तळाशिल परिसरात पर्यटनाच्या विविध संधी लक्षात घेता, स्थानिक पर्यटनाला अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळवून देणे तसेच स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी संस्था कार्यरत राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय केळुसकर यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स