नाणीज येथे जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते दसर्याच्या मुहूर्तावर 'सनातन पंचांग २०२७’ मराठी ॲपचे लोकार्पण.‘
नाणीज येथे जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते दसर्याच्या मुहूर्तावर ‘सनातन पंचांग २०२७’ मराठी ॲपचे लोकार्पण.
नाणीज : श्री क्षेत्र नाणीज येथे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते दसर्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक २० ऑक्टोबर २०२६ या दिवशी ‘सनातन पंचांग २०२७’ या मराठी ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी त्यांनीहे अतिशय सुंदर प्रकारचे पंचांग ॲप असल्याची प्रशंसा केली असून हे ‘सनातन पंचांग’ खूप चांगले असून अतिशय उपयुक्त असल्याचेही स्पष्ट करत अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यायचे आवाहन केले. स्वामीजींनी ‘सनातन पंचांग’ सात भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे आवर्जून सांगत त्यांनी स्वतःच्या भ्रमणभाषवर हो ॲप लगेचच डाऊनलोडही करून घेतले. या वेळी स्वामीजींच्या हस्ते शुभदिनी या ॲपचे लोकार्पण झाले, याबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने श्री. गोविंद भारद्वाज, सौ. दीपा औंधकर, सौ. शुभांगी मुळ्ये आणि श्री. हनुमंत करंबेळकर हे उपस्थित होते.
‘सनातन पंचांग’ हे ॲप Android आणि iOS या दोन्ही प्रणालींवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ अशा ७ भाषांमध्ये उपलब्ध आहे. निनाद गाडगीळ यांनी याबाबत माहिती दिली असल्याचे मालवणचे श्री. अनिकेत फाटक यांनी संबंधित संदेश पत्र सामाईक करत कळवले आहे. याबाबत निनाद गाडगीळ यांच्याशी 8652090398 यांच्याशी संपर्क साधता येऊ शकेल अशीही माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन.
मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे...
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंत...
मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
मालवणात भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू.नगरा...
आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
आंबा काजू नुसकान भरपाई मिळणेसाठी ई - केवायसी प...