ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन.

मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन.

मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन.


Article image

 



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तसेच वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलीस, होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच खाजगी लक्झरी बसेसच्या शहरातील मार्गाबाबत नियोजन करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मालवण नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी प्रतीक थोरात उपस्थित होते.


मालवण हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, शहरातील देऊळवाडा प्रवेशद्वार, सागरी महामार्ग जंक्शन, एस.टी.स्टँड, तारकर्ली नाका, भरड नाका, बाजारपेठ, जेटी, फोवकांडा पिंपळ आणि माघी गणेश चौक या ठिकाणासह अन्य ठिकाणी सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काहीवेळा वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा पर्यटकांसह स्थानिक नागरिक आणि विशेषतः रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना त्रास होत आहे. अनेक वेळा रुग्णवाहिकांना रस्ता मिळणेही कठीण झाले आहे.


त्यामुळे पर्यटन हंगाम संपेपर्यंत वरील सर्व मुख्य नाक्यांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी व त्यांच्या मदतीसाठी होमगार्डची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, असे निवेदन नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या वतीने देण्यात आले. 


मालवण शहरातून सुटणाऱ्या खाजगी लक्झरी बसेस अरुंद रस्त्यांवरून येत असल्याने मोठी कोंडी होते. या बसेसना केवळ सागरी महामार्गावरूनच प्रवासी घेण्याच्या व उतरविण्याच्या सूचना वाहतूक शाखेमार्फत देण्यात याव्यात. शहराच्या अंतर्गत अरुंद रस्त्यांवर त्यांच्या प्रवेशास बंदी घालण्यात यावी.


मालवण शहरातील पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधून नियोजन करण्यात यावे. मालवण शहराची सुव्यवस्था राखण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्या त्या स्तरावरून तात्काळ आदेश निर्गमित करावेत, असे निवेदन मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिले.


सौजन्य | मालवण ब्यूरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 111

लोकप्रिय टॅग्स