ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.

कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू करा.

Article image

मालवण तहसीलदारांकडे मंदिर महासंघ, महाराष्ट्र यांच्यावतीने निवेदन. 


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे, ३ सप्टेंबर २०२६ रोजी 'मंदिर महासंघ, महाराष्ट्र' यांच्यावतीने 'कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मियांसाठी समान लागू' करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.


यावेळी निवेदन देताना श्री गिरोबा देवस्थान नांदरुखचे मानकरी आणि विद्यमान सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण, श्री गिरोबा देवस्थान साळेलचे मानकरी आणि माजी सरपंच कमलाकर गावडे, मानकरी राजाराम दाजी गावडे तसेच मंदिर महासंघाचे दीनानाथ गावडे, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थानचे रुपेश साटम, श्री. काळबादेवी मंदिर मालवणचे मानकरी संदीप धुरी, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगावचे मानकरी श्रीराम परब, धर्मप्रेमी महेंद्र पाताडे तसेच श्री देवी भद्रकाली देवस्थान रेवंडीचे मानकरी विजय कांबळी आणि सनातन संस्थेचे अनिकेत फाटक उपस्थित होते.


यावेळी, इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे, श्री देव विठोबा देवस्थान देवबाग मालवण, श्री भद्रकाली देवस्थान रेवंडी, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगाव या देवस्थानांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली. ह्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत कार्यवाही करण्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकाच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

लोकप्रिय टॅग्स