सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणुस गमावल्याची भावना : आमदार निलेश राणे
सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणुस गमावल्याची भावना : आमदार निलेश राणे
आमदार निलेश राणे यांची कै. सरोज परब यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट.
मसुरे | झुंजार पेडणेकर : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी गुरुवारी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सौ. सरोज परब यांचे शनिवारी २९ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणूस गमावल्याची भावना व्यक्त केली आणि त्यांच्या निधनाची वार्ता खूप धक्कादायक आणि वेदनादायी होती असे सांगितले. आम्ही सर्वजण परब कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी सरोज परब यांचे पती श्री. शिवाजी परब, त्यांच्या कन्या व मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, सुपुत्र उद्योजक राहुल परब यांचे आमदार निलेश राणे यानी सांत्वन केले.
यावेळी मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सोसायटी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, बाळू कुबल, जिल्हा बँक संचालक बाबा परब पं. स. सदस्य छोटू ठाकूर, महेश बागवे, शिवसेना संपर्क प्रमुख राजेश गावकर, सोशल मिडिया प्रमुख किसन मांजरेकर, अशोक बागवे, पंढरीनाथ मसुरकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, गणेश परब, वैभव येसजी, अनिल सावंत,प्रवीण पेडणेकर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सौ. सरोज परब यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि परब कुटुंबियांचे सांत्वन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)