मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये मान्सून स्पोर्ट्स उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये मान्सून स्पोर्ट्स उत्साहात.
मालवण | प्रतिनिधी : मालवणच्या रोझरी स्कूल येथे २८ ऑगस्ट २०२६ व २९ ऑगस्ट २०२६ रोजी 'मान्सून स्पोर्ट्स' हा विद्यार्थी विद्यार्थिनींसाठीच्या क्रीडा कौशल्य विकासाचा उपक्रम उत्साहात संपन्न. यातिल विविध क्रीडा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत त्यांच्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले. रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखालील ह्या उपक्रमाला माजी क्रीडा शिक्षक, तज्ञ प्रशिक्षक व क्रीडा अधिकारी अजय शिंदे विशेष उपस्थित होते.
यावेळी रोझरी इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक भावना यांचे महत्त्व पटवून दिले.
अजय शिंदे यांनी सहभागी स्पर्धकांसह उपस्थित विद्यार्थ्यांना समर्पित क्रीडा संस्कृती विषयक मार्गदर्शनपर संबोधन केले. स्पोर्ट्स कॅप्टन आशिमा कोकरे आणि व्हाईस कॅप्टन जॉनेथन फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, स्पोर्ट्स कॅप्टन, व्हाईस कॅप्टन तसेच रोझरी इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक स्वप्निल तांबे आणि खेळासाठी आलेल्या प्रशिक्षक मान्यवरांचे सहकार्य लाभले. या क्रीडा उपक्रमात स्पोर्ट्स कमिटी व डिसिप्लिन कमिटी यांचे नियोजनासाठी विशेष योगदान लाभले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)