श्री स्वामी समर्थ मठ येथे ३ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा.
श्री स्वामी समर्थ मठ येथे ३ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा.
मसुरे | प्रतिनिधी : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ, मसदे वडाचापाट येथे ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता सामूहिक श्री सत्यनारायण महापूजा आयोजन करण्यात आले आहे.
यादिवशी, सकाळी १० वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मागदर्शन, दुपारी १ वाजता महाप्रसाद - अन्नदान, सायंकाळी ३ वाजता सुस्वर संगित (गायन : सिद्धेश म्हापणकर, मुणगे), सायंकाळी ७ वाजता दैनंदिन आरती, रात्री ७ :४५ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक दिंडी भजन मंडळ - वेरळ यांचे भजन असे कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)