ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मसुरे बागवे हायस्कूल येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर साहस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे बागवे हायस्कूल येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर साहस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.

मसुरे बागवे हायस्कूल येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर साहस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. 

Article image

वैशाली पंडित यांची प्रमुख वक्ता म्हणून उपस्थिती.

 

 

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील, मसुरा एज्युकेशन सोसायटी, मुंबई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे – मर्डे च्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा साहस दिन तथा मार्सेलिस पराक्रम स्मरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात एस. एस. मोरिआ जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून अथांग समुद्रात ऐतिहासिक उडी मारून अद्वितीय धैर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यप्रेमाचा अभूतपूर्व आदर्श जगासमोर ठेवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या सुवर्णक्षणाचे स्मरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना त्यातून राष्ट्रप्रेम, धैर्य व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून मालवण येथील साहित्यिक तसेच निवृत्त इतिहास शिक्षिका वैशाली पंडित यांची उपस्थिती असणार आहे. 

 

या कार्यक्रमात, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक श्री डॉ. दीपक परब, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे सचिव श्री प्रसाद बागवे, मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष श्री उत्तम राणे, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, बागवे हायस्कूल शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, भरतगड देऊळवाडा हायस्कूल क्रमांक २ चे शाळा समिती अध्यक्ष श्री बागवे,  बागवे हायस्कूल प्रभारी मुख्याध्यापिका मसुरेकर मॅडम, भरतगड हायस्कूल क्रमांक २ देऊळवाडा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. कांबळे आणि सर्व कमिटी सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन बागवे हायस्कूलच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स