श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
संप्रदायाच्या वतीने कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांचे उपस्थितीचे आवाहन.
सचिव भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांची माहिती.
मालवण | सुयोग पंडित : श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध, मालवण येथे प्रतीवर्षाप्रमाणे परमपूज्य श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज संप्रदाय यांच्या वतीने बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी श्री. गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
उत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता जगद्गुरू श्री दत्त महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, तर सकाळी ९ वाजता परमपूज्य श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक होणार आहे. दुपारी १२. ३० वाजता माध्यान्ह आरती व दुपारी १. ३० वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ७.३० वाजता धूपारती, रात्री ८ वाजता गादी पूजन व दर्शन सोहळा तसेच रात्री ९ वाजता संप्रदायिक भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या पवित्र गुरुपौर्णिमा उत्सवाला उपस्थित राहून श्रींचे दर्शन, पूजन व महाप्रसादाचा लाभ घ्यायचे आवाहन संप्रदायचे कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)