मसुरे येथे जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब यांचे मार्गदर्शन.
मसुरे येथे जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब यांचे मार्गदर्शन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रथम दोन क्रमांक आणि मसुरे केंद्र गुणवंत विद्यार्थी यांचा रोख पारितोषिक देऊन वार्षिक गुणगौरव आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कै. मदन बागवे शिक्षण निधी आणि दात्यांच्या ठेवी मधून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्यासह मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणारी मसुरा एज्युकेशन सोसायटी ही एकमेव संस्था असावी. विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवावे. आपल्या गावाचा अभिमान राखून शाळेबद्दल आत्मीयता बाळगा. यशामध्ये संस्था, शाळा आणि पालक यांचा मोठा वाटा आहे. हे यश तुमची अंतिम मंजिल नाही तर ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आज मिळालेला हा सन्मान तुम्हाला भविष्यात आणखी मोठे यश मिळवण्यासाठी, समाजाचा एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल. माजी विद्यार्थी संघ चांगला असलेल्या संस्थेला उत्तम भविष्य आहे असे संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब यांनी नमूद केले.
यावेळी विठ्ठल लाकम यांनीही अध्ययनाच्या स्वयंपूर्णतेबद्दल. विद्यार्थी व पालक यांच्यासाठी विशेष मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर स्थानिक समिती अध्यक्ष राजन परब, उद्योजीका सौ. राधिका परब, विठ्ठल लाकम, प्रमोद खाडिलकर, माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर, डॉ. सुधीर मेहेंदळे, संजय बागवे, सौ. अर्चना कोदे, अरुण बागवे, प्रदीप भोगले, पंढरीनाथ नाचणकर, अप्पा परब, एस. आर. कांबळे, ज्ञानदेव पाटील, बाळू परब, राणे, उदय बागवे, सौ. अभ्यंकर, शेखर बागवे आदी उपस्थित होते.
यावेळी बागवे हायस्कूल शिक्षक समीर नाईक यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर मानसी पेडणेकर, कुशल सावंत यांना होतकरू विद्यार्थी म्हणून बक्षीस देण्यात आले. यावेळी विश्वनाथ परब, शशांक पिंगुळकर, शहाजी चौगुले,रमेश पाताडे, विशाखा जाधव, समीर नाईक ,आर्या भोगले, प्रगती मोरे, मंदार पाटील, सायली म्हाडगूत, भानुदास परब, अनिल मेस्त्री, हरी ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दयानंद पेडणेकर यांनी केले आणि मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर यांनी प्रास्ताविक केले ज्येष्ठ शिक्षक एस. आर. कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)