नगरसेवक मंदार ओरसकर यांचा पाठपुरावा आणि गवंडीवाड्यातील व्हाळीची साफसफाई.
नगरसेवक मंदार ओरसकर यांचा पाठपुरावा आणि गवंडीवाड्यातील व्हाळीची साफसफाई.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील गवंडीवाडा प्रभाग क्रमांक '८ ब' मधील कोदे घरासमोरच्या व्हाळीत ( छोटा प्रवाही नाला) मोठया प्रमाणात कचरा साचल्याने पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहास अडचण निर्माण होत होती. याबाबत बबन वाघ यांनी नगरसेवक मंदार ओरसकर यांचे लक्ष वेधले.
नगरसेवक मंदार ओरसकर यांनी याबाबत नगरपरिषद प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार नगरपरिषद माध्यमातून साचलेला कचरा काढून तसेच साफसफाई करून व्हाळीचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. मागणीची तात्काळ दखल घेऊन काम पूर्ण करून घेतल्याबद्दल नागरिकांनी नगरसेवक मंदार ओरसकर, नगरपरिषद प्रशासन यांचे आभार मानले आहेत, अशी माहिती बबन वाघ यांनी माध्यमांना दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)