ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
​वडाचापाट येथे ७ ऑगस्टला मोफत आरोग्य शिबिर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

​वडाचापाट येथे ७ ऑगस्टला मोफत आरोग्य शिबिर.

​वडाचापाट येथे ७ ऑगस्टला मोफत आरोग्य शिबिर.

       

मसुरे | प्रतिनिधी : कोंकण कॅन्सर अ‍ॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वडाचापाट ग्रामपंचायत आणि उद्योजक दयानंद प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. ​या शिबिरात प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर आदेश पालयेकर (M.S., M.Ch.-Surg. Oncology, Consultant Surgical Oncologist) आणि डॉ. गायत्री पालयेकर (M.B.B.S., DGO, DNB, FRM, Laparoscopic Surgeon, IVF Specialist) रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.


यावेळी विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी व निदान, तसेच सर्व प्रकारच्या गाठींची तपासणी, स्त्रियांच्या सर्व आजारांची तपासणी, गर्भाशय व गर्भाशयातील गाठी, प्रजनक्षमता वाढवणे, प्रसूतीपूर्व तपासण्या आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन, सर्व प्रकारचे हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, पोटाच्या आतड्यांच्या तपासण्या, मुत्रविकार व किडनी तपासणी, प्रोलॅप्स सर्जरी निदान, किमोथेरपी व जनरल तपासणी.अतिजोखमीच्या व लहान - मोठ्या शस्त्रक्रियांबद्दल मोफत माहिती व मार्गदर्शन, ​शिबिराच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राथमिक तपासण्या व शस्त्रक्रियांसंदर्भात आवश्यक माहिती दिली जाईल. ​शिबिराच्या ठिकाणी कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


​या मोफत आरोग्य शिबिराचा वडाचापाट आणि आजुबाजूच्या सर्व गावांतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स