ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
'विद्या विनयेन शोभते' हा विचार कायम लक्षात ठेवण्याची गरज...!

'विद्या विनयेन शोभते' हा विचार कायम लक्षात ठेवण्याची गरज...!

'विद्या विनयेन् शोभते' हा विचार कायम लक्षात ठेवण्याची गरज...!  

Article image


मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची NEET पेपरफुटी, आंदोलन, लाठीचार्ज आणि संबंधित घडामोडींवर प्रतिक्रिया.


मुंबई | ब्यूरो न्यूज : मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी NEET परीक्षेची पेपरफुटी आणि त्यानंतरच्या दिल्लीसह देशात घडलेल्या विविध घडामोडींबाबत एका प्रसिद्धी संदेशाद्वारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शैक्षणिक क्षेत्र समजून घेणे आणि त्यासोबत 'विद्या विनयेन् शोभते,' हा प्राथमिक शाळेतील भिंतींवरचा आपला भारतीय सांस्कृतिक सुविचार रोज आचरणात आणण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे. पेपरफुटीतील दोषींवर कारवाई आणि त्याची तांत्रिक नैतीकता असलेल्या सर्वांचा राजिनामा ही मागणी त्यांनी अधोरेखीत करत पाठिंबा देखिल दर्शवला आहे.


श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशात सांगितले आहे की विद्यार्थी व पालकांच्या जेंव्हा तक्रारी व मागण्या सुरू झाल्या तेंव्हाच सुशासन म्हणून संबंधित विभागाच्या माध्यमातून किंवा एखाद्या तटस्थ प्रणालीद्वारा, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे ही गरज होती. तसेच प्रत्यक्ष आंदोलना दरम्यान काही आंदोलनकर्ते, त्यांचे विविध स्तरातील काही पाठिराखे यांनीही त्यांच्या आंदोलना दरम्यान वर्तनाचा आणि बोलण्याचे आत्मपरीक्षण करत 'आंदोलनाचा नेमका उद्देश' ध्यानात राखणे आवश्यक होते असेही श्रीकांत सावंत यांनी आवर्जून नमूद केले आहे. लाठीचार्ज व कारवाई या घटनांपूर्वी चर्चेसाठी जवळपास २० दिवसांचा अवधी 'नेमका कशासाठी' घेतला गेला, असा सवाल देखिल श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशात उपस्थित केला आहे.  


देशातील स्थैर्यासाठी आणि मानवतेच्या मनोधैर्यासाठी 'विद्येचा सन्मान' करण्याला प्रथम प्राधान्य देत सुसंवाद घडावा अशी अपेक्षा मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी त्यांच्या प्रसिद्धी संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स