ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.

मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहीम.

Article image

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांची संकल्पना व मार्गदर्शन तसेच बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापार्डेकर व लायन्स क्लबचे सदस्य, मालवण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून संपन्न मोहीमेत ५०० टन कचरा संकलित.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणात चिवला बीचवर, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली तसेच बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापार्डेकर यांच्या सहभागाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला. चिवला बीच परिसरातील प्लास्टिक, कचरा व इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. लायन्स क्लबचे सदस्य, मालवण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक यांचा या मोहिमेत सहभाग होता.

Article image


पर्यटनासोबत स्थानिक नागरीकांचे रोजगार, लहान मुलांचे 'विना मोबाईलचे' खेळ व विरंगुळा, सहकुटुंब शांतता मिळवण्याचे नैसर्गिक भाग्याचे ठिकाण आणि प्रत्येक शहर वासियाचा अभिमान असलेले मालवणचे विविध पर्यटन किनारे व लगतच्या परिसरांची होणारी स्वच्छता ही आरोग्य व सर्वांगीण दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त आहे आणि याची गरज लक्षात घेऊन मालवण नगरपरिषद व संबंधितांच्या वतीने संपन्न झालेल्या ह्या मोहीमेबद्दल अनेकांनी कृतज्ञतापर समाधान व्यक्त केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स