ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.

निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा..!


कुडाळ : माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांवर मनमानीचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दिपक जयराम काणेकर, मिलिंद रामा धुरी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात, शासकीय जागेतील बेसुमार वृक्षतोड, स्थानिक शेतकऱ्यांना योग्य माहिती व प्रशिक्षण न देणे तसेच एकाच ठिकाणी अधिकारी दीर्घकाळ पदभारावर राहणे, यासह विविध मुद्द्यांवर आरोप करण्यास आले आहेत.


या प्रकरणाची यापूर्वी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर समिती नेमण्यात आली मात्र समितीने या प्रकरणात पारदर्शक भूमिका घेतली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आल्याचा संशयही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.


दरम्यान, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाहणीत २ ते ३ एकर क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. निळेली पशुपैदास क्षेत्राचे सुमारे ५०० एकर शासकीय क्षेत्र असल्याचे सांगत, संपूर्ण क्षेत्राची पाहणी केल्यास शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


या सर्व प्रकरणाची खाते निहाय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कृषी विद्यापीठाने नेमलेल्या समितीच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणात कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संशयही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.


या सर्व बाबींची योग्य चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ दीपक काणेकर मिलिंद धुरी, विनोद जाधव, नामदेव जानकर, सखाराम गावडे, नकुल गवंडे, किशोर दळवी, विष्णू राणे, वसंत दळवी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनाच्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स