ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वेंगुर्लेत भाजपच्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धत योगेश पालव यांना विजेतेपद...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वेंगुर्लेत भाजपच्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धत योगेश पालव यांना विजेतेपद...!

प्रकाशन: 05 Nov 2021 11:42 AM
वाचन संख्या 53

ब्युरो न्यूज | विवेक परब : भारतीय जनता पक्ष वेंगुर्लेतर्फे आयोजीत दिपावली सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेत वडखोल (वेंगुर्ले)येथील योगेश नंदकिशोर पालव यांच्या आकाशकंदीलाला प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक प्राप्त झाले.
भाजपने आयोजित केलेल्या ‘दिप:ज्योती नमोस्तुते वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव http://localhost/news/public/uploads/202’,अंतर्गत येथील श्री रामेश्वर मंदिरात घेण्यात आलेल्या या इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. द्वितीय क्रमांक अणसूर येथील प्रमोद सदाशिव गावडे, तृतीय क्रमांक दाभोसवाडा वेंगुर्ला येथील राजाराम सदाशिव लोणे तर उत्तेजनार्थ पारितोषिक आनंदवाडी येथील मयुरेश  सुरेश जाधव व गाडीअड्डा येशील यशोदा सुदेश वेंगुर्लेकर यांनी प्राप्त केले. या स्पर्धेसाठी रोख http://localhost/news/public/uploads/2000, 1500, 1000 व उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी 500 रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती. स्पर्धेचे परीक्षण जे जे आर्ट स्कूलचे निवृत्त प्रा. सुनील नांदोस्कर यांनी केले.
स्पर्धेचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, सुनील नांदोस्कर, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेविका श्रेया मयेकर , रामेश्वर देवस्थानचे ट्रस्टी रविंद्र परब , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , महिला मोर्चाच्या रसीका मठकर , बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, नितीश कुडतरकर ,छोटु कुबल ,संजय पाटील, महेंद्र मातोंडकर  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स