ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
किल्ले सिंधुदुर्गच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी.

किल्ले सिंधुदुर्गच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी.

किल्ले सिंधुदुर्गच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी.

Article image

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : किल्ले सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त, विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून सदर ठिकाणी पाहणी व पुढील अनुषंगिक कार्यवाही करणेबाबत कळविले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India), मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड उप - मंडल चे संरक्षण सहाय्यक संकेत कावलकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, देवबाग ग्राम महसूल अधिकारी श्री वायाळ व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी नुकतीच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील अलीकडेच ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी दिनांक १९ जुलै २०२६ च्या संध्याकाळी केली. 


या पाहणीदरम्यान ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता, दगडी बांधकामाची अवस्था तसेच समुद्री लाटा, भरती-ओहोटी आणि पावसामुळे झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यक तांत्रिक निरीक्षणे व मोजमाप करून संवर्धनासाठी उपयुक्त माहिती संकलित करण्यात आली.


पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन व आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या अलीकडील पडझडीमुळे त्याच्या संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित झाली असून, ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 588

लोकप्रिय टॅग्स