ताज्या बातम्या
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश. रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी. मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात. देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देऊ पहाणारा जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम. कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा.
तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

Article image

श्री भैरवी देवालय मालवण येथे आयोजित भजन महोत्सव २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात उद्योजक दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान.

Article image


मालवण | प्रतिनिधी : श्री भैरवी देवालय, संतसेना मार्ग, मालवण येथे आयोजित भजन महोत्सव २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात उद्योजक दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, शहर व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, नाभिक समाज तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, बाळगोपाळ मंडळ अध्यक्ष अंकुश चव्हाण, भैरवी देवालय मंडळ अध्यक्ष विजय चव्हाण, आनंद आचरेकर आदी उपस्थित होते.


यावेळी सुप्रसिद्ध बुवा विनय नांदोस्कर यांचा उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमात संबोधित करताना उद्योजक दत्ता सामंत म्हणाले की भजन ही केवळ करमणुकीची कला नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माची समृद्ध परंपरा पुढे नेणारे प्रभावी माध्यम आहे. भजनाच्या माध्यमातून समाजाला चांगले विचार, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाने अध्यात्माची कास धरली तर मनाला शांती आणि जीवनाला योग्य दिशा मिळू शकते असेही उद्योजक दत्ता सामंत यांनी विशेष नमूद केले.


आपल्या कोकणच्या मातीत भजन, कीर्तन आणि अध्यात्माची मोठी परंपरा आहे. या परंपरेमुळे पिढ्यान्‌पिढ्या सुसंस्कारांची शिदोरी पुढे गेली आहे. भजनातून संतांचे विचार आणि अध्यात्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अशा भजन महोत्सवांचे आयोजन ही काळाची गरज आहे असे विशेष आग्रहाचे उद्योजक दत्ता सामंत यांनी आवाहन केले. 


अध्यात्म म्हणजे देवपूजेसोबतच, माणसाने माणसाशी प्रेमाने वागणे, समाजासाठी योगदान देणे आणि चांगले संस्कार पुढील पिढीला देणे होय. भजनातून भक्तीबरोबरच एकता, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे भजनाची ही परंपरा अधिक जोमाने पुढे नेली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सुसांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि मोबाईल आणि आधुनिक जीवनशैलीच्या काळातही संत परंपरेतील विचार तरुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असेही उद्योजक दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स