भराडी देवी सेवा मंडळ, दिवा संस्थेच्या वतीने वारकऱ्यांची सेवा.
भराडी देवी सेवा मंडळ, दिवा संस्थेच्या वतीने
वारकऱ्यांची सेवा.
संस्थापक रुपेश दुखंडे यांच्या विचारातल्या 'जीवनातला एक दिवस त्या चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी' ह्या संकल्पनेतून सलग चौथ्या वर्षी संपन्न उपक्रमात पदाधिकारी, सदस्य व सहकारी यांचा सहभाग.
मसुरे | प्रतिनिधी : यंदा, पंढरपूर वारीच्या निमित्त, 'भराडी देवी सेवा मंडळ, दिवा' संस्थेच्या वतीने आणि पदाधिकारी, सहकारी यांच्या सहकार्यातून सासवड पुणे येथे जाऊन वारीतील वारकऱ्यांनाची मंडळाच्या वतीने मोफत चहा, बिस्कीट, पाणी वाटप करून या सर्व वारकऱ्यांची सेवा केली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मालवण तालुक्यातील, मसुरे मागवणे वाडी येथील सुपुत्र रुपेश दुखंडे यांच्या विचार संकल्पनेतून, ते संस्थापक असलेल्या 'भराडी देवी सेवा मंडळ, दिवा' यांच्या वतीने 'सलग चौथ्या वर्षी' सासवड पुणे येथे पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारीतील वारकऱ्यांना भेटून त्यांची सेवा आणि त्यांना मोफत अल्पोपहार असा हा उपक्रम संपन्न झाला.
'जीवनातला एक दिवस त्या चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची काहीतरी सेवा करावी,' हा विचार घेऊन श्री. दुखंडे आणि ते ज्या संस्थेचा संस्थापक आहेत त्या 'भराडी देवी सेवा मंडळ, दिवा' या संस्थेच्या वतीने आणि त्यांचे सहकारी, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य अशा मान्यवरांनी 'सासवड, पुणे' येथे जाऊन मंडळाच्या वतीने सलग चौथ्या वर्षी वारकऱ्यांसाठी हा उपक्रम संपन्न केला. संबंधित सर्व वारकऱ्यांनी याबद्दल संस्था व संस्थापक रुपेश दुखंडे आणि उपक्रमातील सर्व सहकार्यकारक घटक आणि सहभागींचे आभार व्यक्त केले.
यावेळी विविध वारकरी बांधव, संस्थापक रुपेश दुखंडे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष कृष्णा चौगुले, सचिव अरविंद घोगळे, खजिनदार देवेंद्र चव्हाण, अमोल दळवी, संभाजी कणसे, ओमकार चव्हाण, निखिल घाडी, शहाजी काबुगुडे, बलराज शिंदे, प्राजक्ता लाड, जागृती पानसरे तसेच मंडळाचे कार्यकर्ते आणि सहकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)