मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
नगराध्यक्ष ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांचे मार्गदर्शन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेमार्फत दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळपासून मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी 'सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, नागपूर' या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना भटक्या श्वानांमुळे होणारा त्रास, नागरिकांची सुरक्षिततता लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित नियम व प्राणी कल्याणविषयक तरतुदींचे पालन करून आवश्यक कार्यवाही करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे असे समजते आहे.
मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती पूनम चव्हाण व सहकारी यांनी याबाबत विशेष पाठपुरावा केला होता. मालवण नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)