आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा.
आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा.
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. आगामी दुष्काळ स्थितीच्या पार्श्वभूमीवर, या उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून गावातील पाणीप्रश्न सुटण्यास मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे.
या श्रमदान व बंधारा उभारणी प्रसंगी सरपंच रश्मी टेंबुलकर, ग्रामपंचायत अधिकारी आत्माराम जोशी, केंद्रचालक प्रिशा बांदल, कर्मचारी विजय चव्हाण, माजी सरपंच रविंद्र टेंबुलकर यांच्यासह ग्रामस्थ चंद्रकांत घाटगे, मोहन घाटगे, मनोहर घाटगे, विजय सुकाळी, शरद घाटगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)