ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.

पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.

पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.


शेतकरी, महिला बचत गट, युवक - युवती, विद्यार्थी, गृहिणी आणि निसर्गप्रेमींनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी होऊन स्पर्धेत भाग घ्यायचे श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाच्या वतीने अध्यक्ष उल्हास सावंत व सदस्यांचे आवाहन.

Article image


विविध रानभाज्यांचे लाईव्ह सॅम्पल प्रदर्शन व माहिती देण्यात असून रोख बक्षिसे व सन्मानपत्राची घोषणा.

Article image


ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथे श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा, मंडळाच्या वतीने भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विविध रानभाज्यांचे लाईव्ह सॅम्पल प्रदर्शन व माहिती देण्यात येणार आहे. तसेच रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम विजेत्याला रोख रक्कम २०००/_, द्वितीय विजेत्याला रोख रक्कम १५००/_आणि तृतीय क्रमांकाला १०००/_रूपयाचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सहभागी नागरिकांना सन्मानपत्र दिले जाणार आहे. याशिवाय रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म व उपयोग याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Article image


या महोत्सवाला शेतकरी, महिला बचत गट, युवक - युवती, विद्यार्थी, गृहिणी आणि सर्व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाकडून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी सरपंच चंद्रकांत गोलतकर (9422232489) व अमित पुजारे (9420405914 ) यांच्याशी संपर्क करावा अशी माहिती मिळत आहे. ही स्पर्धा आणि महोत्सवात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत आणि सदस्यांनी केले आहे.


रानभाज्यांचे दैनंदिन आहारातील महत्त्व, त्यांची योग्य ओळख, सुरक्षित वापर आणि आरोग्यासाठी होणारे फायदे याबाबत या महोत्सवातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स