बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
मालवण : मालवण शहरात राजकोट मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने बांधकाम सभापती तथा मालवण नगरपरिषदेचे नगरसेवक आणि लायन्स क्लब अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत दैवज्ञ भवन, मालवण येथे होणार आहे.
या रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करत या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजकोट मित्रमंडळ, मालवणच्या वतीने करण्यात आले आहे. शिवसेना शहर संघटक व उद्योजक राजू बिडये यांनी याबाबत माहिती दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)