ताज्या बातम्या
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.

मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.

Article image


लिमये हॉस्पिटल व रोटरी क्लब मालवण यांचे संयुक्त आयोजन.


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट २०२६ रोजी लिमये हॉस्पिटल व रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने BMD (Bone Mineral Density) तपासणी शिबिर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डाॅ. लीना लिमये यांनी याबाबत माहिती दिली आहे.  


वाढते वय, व्यस्त जीवनशैली आणि कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. मात्र योग्य वेळी तपासणी केल्यास ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार लवकर ओळखता येतात आणि भविष्यातील गंभीर समस्या टाळता येतात या अनुषंगाने, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत लिमये हॉस्पिटल, भरड, मालवण येथे हे शिबीर संपन्न होणार आहे.


ही तपासणी विशेषतः ४० वर्षांवरील सर्व महिलांसाठी व ६० वर्षांवरील सर्व पुरुषांसाठी असेल. हाडांची घनता (Bone Density) मोजणे, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वेळेत ओळखणे यासाठी ही तपासणी फायदेशीर असून ती तपासणी अवघ्या २ मिनिटांची तसेच वेदनारहित व सुरक्षित आहे अशी माहिती मिळत आहे. इच्छुकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स