ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

Article image


ज्येष्ठ व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा पुढाकार तर व्यावसायिक राजू म्हापसेकर व व्यापारी बांधवांची उपस्थिती.


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकातल्या नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या पुढाकारातून तसेच इमारती मधील व्यावसायिक श्री अनिल मेस्त्री यांच्या समवेत १७ जुलै २०२६ रोजी भेट घेतली व निवेदन दिले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना सर्व व्यावसायिकांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सर्वांगीण वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.


यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर यांनी इमारती संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी, मागील भेटी दरम्यान नमूद केल्याप्रमाणे 'इमारती मधील तसेच सर्व खोके धारकांची तपशीलवार माहिती' सादर करण्यात आली. नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी याबाबत उपस्थितांकडून देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे जाणून घेतली.


ज्येष्ठ व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी याबाबत सर्वांच्यावतीने माहिती देताना सांगितले आहे की, या निवेदनाद्वारे कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पूर्वीचे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना सांगितले गेले आहे. पहिल्या मजल्यावरील भिंती, छप्पर सुध्दा कोसळून पडले आहे. तसेच एका बाजूने स्लॅब सुध्दा कोसळला असून, इमारत धोकादायक बनली आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावर १३ आणि ३ + १ पत्रा शेड असे एकूण १७ गाळे धारक आहेत. त्याचप्रमाणे ३६ खोके धारक असून या सर्वांची नगरपंचायत मध्ये नोंद असून सर्व वेळोवेळी भाडे भरणा करत आहेत त्याचप्रमाणे १० ते १५ वर्षे येथील गाळे भाड्याने घेऊन, जे १५ ते १६ जण व्यवसाय करत आहेत त्यांचा ही विचार केला जावा अशी विशेष विनंती करण्यात आली आहे. नवीन होणाऱ्या संकुलात, नवीन नियमानुसार आवश्यक अनामत रक्कम, नव्याने लागू होणारे भाडे भरण्यास संबंधित सर्वजण तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे असे श्री. पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. 


नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त दैनंदिन कामांतून या विशेष भेटीसाठी त्यांचा बहूमूल्य वेळ दिल्याबद्दल तसेच सविस्तर माहिती जाणून घेतल्याबद्दल राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि उपस्थित सर्व व्यावसायिकांनी नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.

लोकप्रिय टॅग्स