राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची 'नीलरत्न' निवासस्थानी घेतली भेट.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची 'नीलरत्न' निवासस्थानी घेतली भेट.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, डाॅ. अनिरुद्ध मेहेंदळे आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी मालवण येथील 'नीलरत्न' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल त्यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरुवात केलेल्या समायोजनाच्या प्रकियेस आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांनी तसेच आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ ते २० वर्षाच्या आरोग्य सेवेनंतर उज्ज्वल भविष्य मिळाले असे सांगत कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व महायुती सरकारचे आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह पदाधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, दिनार पडते, रश्मी सोहनी, सचिन परब, मनोज मालाडकर, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, भारती सावंत, रेश्मा पटेल, स्नेहा सावंत, स्वाती जळवी, क्रांती तोरसकर, सायली नाईक, शीतल खरात, रेश्मा मयेकर, गीतांजली पालव, ज्योती मराळ, सुविधा प्रभू, वेंगुर्लेकर, मूननकर, लीना अलमेडा यांसह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)