ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने महिला बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ.

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने महिला बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ.

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने महिला बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ. 

Article image

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य सचिव ई. रवींद्रन यांचे वेधले होते लक्ष.


कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन अदा झाले नव्हते. सोबतच नवीन नियुक्ती किंवा मुदतवाढ मिळाली नव्हती, या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य सचिव ई. रवींद्रन यांचे लक्ष वेधले होते.


मंगळवार, १४ जुलै रोजी या ५२ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळाली असून रखडलेले वेतनसुद्धा मिळणार आहे. सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ जरी मिळाली असली तरी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत आमदार निलेश राणे व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात चर्चा सुरू आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून आपल्याला मुदतवाढ मिळवून दिल्याबद्दल महिला बाल रुग्णालयातील कर्मचारी यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स